Document Actions


ग्रामीण भारतातील आरोग्याची विद्यमान स्थिती

भारताच्या ग्रामीण लोकांच्या आरोग्याची स्थिती ही एक चिंतेचं कारण बनली आहे, विशेषतः आरोग्यसेवा ही वाढत्या प्रमाणात खाजगी रुग्णालयांव्दारे पुरवली जात आहे, आणि आरोग्यावरील खर्च हा वाढत्या प्रमाणात ग्रामीण गरीबांच्या क्षमतेबाहेर जात आहे.

विद्यमान 'जैववैद्यकीय आकृतीबंधा' पासून 'सामाजिक-सांस्कृतिक आकृतीबंधा' कडे मोठा बदल सध्या गरजेचा आहे, जो तफावत दूर करेल आणि ग्रामीण जीवनाची गुणवत्ता सुधारेल.  विद्यमान असमानतेवर उपाय करुन, आणि प्रामुख्यानं ग्रामीण आरोग्यासाठी एक दीर्घकालीन दृष्टीकोनात्मक योजनेच्या दिशेने काम करणे, अत्यावश्यक आहे.  युनीसेफ (हैदराबाद) यांनी तयार केलेल्या शिशु संरक्षक या मातृत्व आरोग्यावरील आंतरक्रियात्मक बहुभाषिक सीडीचा वापर करण्याची विशेष परवानगी आपल्याला मिळाली आहे.  त्यामध्ये एका बालकाची, गर्भधारणा ते पौगंडावस्था या दरम्यानच्या जीवनातील विविध अवस्थांची आवश्यक माहिती देण्यात आली आहे.

www.indg.in या वेबसाईटव्दारे लोकांना आरोग्याशी निगडीत सेवांसाठी एक मंच उपलब्ध करण्याचा उद्देश आहे, जसे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य आणि स्वच्छता याविषयीच्या विशेष योजना आणि अंततः आरोग्य सेवकांना ग्रामीण समुदायांसोबत शक्य तितक्या चांगल्या पध्दतीनं जोडण्याचा त्यात उद्देश राहील.

thinimage
स्वाईन फ्ल्यू
bullet1 स्वाईन फ्ल्यू म्हणजे काय?
bullet1 स्वाईन फ्ल्यू संबंधी इशारा
bullet1 एच१एन१ विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी घ्यावयाची काळजी
thinimage
हेल्पलाईन
bullet1 स्वाईन फ्ल्यूच्या उपचारासाठी सरकारमान्य इस्पितळे
bullet1 टोल फ्री क्रमांक
thinimage
उपयुक्त माहिती
bullet1 स्वाईन फ्ल्यूपासुन संरक्षण कसे करावे?
bullet1 हात कसे धुवावेत?
bullet1 ताजी माहिती
thinimage



Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

ही साईट पुढील मानकांनुसार आहे