संचार व्यवस्थेकरीता आणखी चांगल्या क्षमतांची बांधणी करणे
मी पोनामांडा गावांत अश्विनी केंद्र .............
मी पोनामांडा गावांत अश्विनी केंद्र संचालिका म्हणून कार्यरत आहे. मी खूप लोकांना पुष्कळशा प्रकारच्या वेबसाइटची रचना करतांना पाहिले आहे. माझ्या गावांतील लोकांना फक्त तेलुगू भाषाच येत असल्याने, मला एक तेलुगू वेबसाइट तयार करायची होती. तथापि, मी कंप्यूटरमध्ये (संगणकामध्ये) तेलुगूच्या वापराच्या बाबतीत अनभिज्ञ होते.
InDG उपक्रमाचा भाग म्हणून, अश्विनी केंद्र संचालकांसाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या दरम्यान, "कशाप्रकारे तेलुगूचा वापर कंप्यूटरमध्ये करावा आणि तेलुगूमध्ये टाइप (टंकलेखन) करावे." तेव्हां मग मी तेलुगूमध्ये टाइप करायला शिकले.
ह्या नवीन साधलेल्या कौशल्यांसह, मी माझ्या गावांवर एक ब्लॉग-स्पॉट तयार करायचा प्रयत्न केला, तेलुगूमध्ये !! सुरूवातीला, मी तेलुगूमध्ये हे करू शकेन की नाही याबद्दल मी साशंक होते. पण एकदा काम सुरू केल्यानंतर, मला त्याबद्दल अतिउत्साह वाटू लागला. मी माझ्या गावांवर तेलुगूमध्ये पुष्कळसा मजकूर घातला आहे. मी यामध्ये InDG ला एक लिंकदेखील दिली आहे. http://ponnamandagram.blogspot.com/ वर जाऊन जास्त माहिती मिळवा.
हे नवीन कौशल्य आत्मसात करण्याकरीता प्रशिक्षण देण्यासाठी मी InDG टीमची आभारी आहे.
सुश्री. सत्यलता, पोनामांडा गांव, पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्रप्रदेश








