Document Actions


प्राथमिक शिक्षण

प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक नागरिकाच्या आणि देशाच्या विकासाचा पाया आहे. आताच काही काळापूर्वी, भारताने प्राथमिक शिक्षणाच्या हजेरीपटात, मुलांच्या सातत्‍यात (टिकून राहण्‍यात), नियमित उपस्थितीच्‍या दरात प्रचंड प्रगती केलेली आहे आणि जवळपास दोन-तृतीयांश लोकसंख्येला साक्षर करण्यात यश मिळवि‍ले आहे. भारताच्या आर्थिक विकासात भारताच्या सुधारलेल्या शिक्षणपद्धतीचा महत्त्वाचा वाटा असल्याचे नेहमीच म्हटले जाते. मात्र त्याच वेळी भारतातील प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता मात्र नेहमीच काळजीचा विषय राहिला आहे.

चौदा वर्षापर्यंतच्या सर्व मुलामुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण हे भारतामध्ये संवैधानिक वचन आहे. भारताच्या संसदेने नुकताच शिक्षणाधिकार कायदा मंजुर केला ज्यामुळे शिक्षण हा आता 6-14 या वयोगटातील सर्व मुलामुलींचा मूलभूत हक्क ठरला आहे. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे म्हणजेच सर्व ठिकाणी शाळेची सोय आणि 100% हजेरीपट आणि मुलांचे सातत्य यांचे सुवर्ण उद्दिट्ष्य भारताला अजून गाठायचे आहे. आणि यामधील हे अंतर भरुन काढण्याकरीताच सरकारने 2001 मध्ये सर्व शिक्षा अभियान सुरु केले आहे. हे अभियान जगातील अशा प्रकारच्या काही सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या ह्या युगात शिक्षणातील ’आहे’ आणि ’नाही’ वर्गातील, विशेषतः ग्रामीण भारतातील दरी भरुन काढण्याचे फार मोठे काम आयसीटी करत आहे. इंडिया डेव्हलपमेंट गेटवेची ही प्राथमिक शिक्षण शाखा म्हणजे भारतातील प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिट्ष्य गाठण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मुबलक साहित्य आणि संदर्भ उपलब्ध करुन देऊन त्यांना सक्षम बनवण्याचा एक प्रयत्न आहे.

prathamic shikshan

यांनी सादर केले arunkumar madhusudan janavekar इथे June 19, 2010 10:09 PM
shalet pustake,kapade,building,sarva aahe pan guruji kuthe aahet?aatatar pariksha band kelya aata gunvata kashi tapasnar?gunvatta tapasta yenar nahi mhanun palak mulana khasgi shalet pravesh ghet aahet.govt shalet ajunhi benches nahi sagnak tar ajun labac.kamchukar shikkana pariksha naslane etar udyog karnas janu mubhac milali.8vi paryant paricsha nahi tar to mulga 9vi paricsha kashi kay denar?yayy dhornanusar shassn class4 che nirman karnar aahe ka?garibache mulani spardhet tikayche ki nahi?jar prathamic shishanac yogya milat nahi tar pudhil shikshanache kay?ajunhi gavatil gramshikshan samitina hakka va kartava mahit nahit. ya sarva babicha vichar kelayas gramin bhagat ajunhi prathamic shikshana babat jagruti karane garjeche aahe.





 

Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

ही साईट पुढील मानकांनुसार आहे